शिकण्याची पद्धत ही मुलांसाठी शाळेमध्ये खुप महत्त्वाची आहे
सौ. प्रियांका भुषण ढवळे
( विशेष शिक्षिका )
स्वतःच्या विश्वात, विचारात रमणे म्हणजेच स्वमग्नता, ही नेहमी समाजापासून अवतीभवतीच्या वातावरणा पासून अलिप्त राहतात. शारिरीक दृष्ट्या काही वैगुण्य नाही. पण बोलणे कमी, एकटे राहने, फार मऊ व फार खडबडीत स्पर्श नकोसा वाटणे, शुन्यात नजर लावून बसने,चिडचिड करणे,उगाचच रडणे अशी लक्षणे दिसली कि बहुधा पालक आपलं बाळ मुडी आहे किंवा हट्टी आहे असे समजून त्याच्याकडे
दुर्लक्ष करतात. स्वमग्न पालकात शारीरिक व्यंग नसल्याने या मुलांच्या बोलण्या, वागण्यात पालकांना या आजाऱ्याची लक्षणे ओळखावी लागतात. त्यामुळे अनेकदा आजार उशिरा लक्षात येतो. तेव्हा नाइलाजाने आपल्या मुलांना मतिमंद बालकांच्या शाळेत दाखल करावे लागते.
परंतु स्वमग्न मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शैक्षणिक कौशल्य क्रेएटिव्ह पद्धतीने देऊ शकतो व त्यांचे जीवन प्रभावशाली करण्याचे प्रत्येक पालक शिक्षक, थेरपिस्टने हे प्रयत्न केले पाहिजे त्या पद्धितीचा वापर केल्यास मुले खूप लवकर आत्मसात करतात व उत्साहाने व आनंदानं त्या ऍक्टिव्हिटी कडे पाहतात.
स्वमग्नता मुलांना शिकविण्याच्या पध्दती व युक्ती :-
* शहरी भागातील मुलांना वेगवेगळ्या थेरपी व वेगवेगळी साधने उपलब्ध असतात, याउलट ग्रामीण भागात थेरपी व साधनांचा अभाव दिसून येतो. म्हणुन मी आज ग्रामीण भागातील मुलांसाठी शैक्षणिक कौशल्य अजुन प्रभावी कशा प्रकारे करू शकतो. हे खालील प्रमाणे
१) A,B,C,D….ही मुळाक्षरे शिकविताना आपण बहुधा तक्ता, पुस्तक, ठोकळे यांचा वापर करतो पण ही मुळाक्षरे टाकाऊ पासुन टिकाऊ म्हणजेच, आईस्क्रिम स्टीकचा वापर करून मुलांना A,B,C,D….ही मुळाक्षरे शिकवू शकतो. व या पद्धतीने शिकवल्यास मुले लवकर आत्मसात करतात व कलरफुल आईस्क्रिम स्टीककडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात.
२) दुसरी पद्धत म्हणजे शहरी भागात क्लेचा वापर केला जातो. पण ग्रामीण भागात क्ले, उपलब्ध असलेच असे नाही मग आपण शेतातील माती किंवा गव्हाचे पिठ व मिठ ( एक वाटी गव्हाचे पिठ असेलतर अर्धा वाटी मिठ ) असे घट्ट मळुन छान प्रकारे क्ले तयार होतो व हे खुप दिवस टिकत व हे मुलांच्या तोंडात गेले तरी काहीही धोका उत्पन्न होत नाही. व या क्लेद्वारे आपण वेगवेगळे आकार चांगल्या प्रकारे शिकवु शकतो. ही क्रिया मुलं खुप आनंद घेऊन करण्याचा प्रयत्न करतात.
३) तसेच १,२,३….. हे अंक आपण मुलांना चार्ट, तक्ता, ठोकळे याद्वारे न शिकविता वाळु, माती, शेविंग फॊम याद्वारे १,२,३…हे अंक शिकवु शकतो म्हणजेच पसरट भांडयात वाळु टाकुन त्यामध्ये शिक्षकांच्या मदतीने मुलांचे हात पकडुन बोटांच्या साहयाने अंक काढु शकतो. अशाप्रकारे आपण माती शेविंग फोम याद्वारे अंक शिकवु शकतो. अशा प्रकारे शैक्षणिक कौशल्य स्वमग्न मुलांना वेगवेगळ्या युक्तींचा वापर करून मुलांचे लक्ष केंद्रित करून मुलांना शिकवु शकतो.
Recent Comments